फिलीपींस: अमेरिकन साखर कोटा रद्द करण्याची युनाइटेड शुगर प्रोड्यूसर्स फेडरेशनची मागणी

218

मनीला : देशात उत्पादन होणारी साखर फक्त स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळ आगामी वर्षात अमेरिकेला दिलेला साखर कोटा रद्द करावा अशी मागणी युनायटेड शुगर प्रोड्यूसर्स फेडरेशनने (यूएनआयएफईडी) शुगर रेग्यूलेटरी अॅडमिनिस्ट्रेशनकडे (एसआरए) केली आहे. युनिफेडचे अध्यक्ष मॅन्युअल लमाता यांनी सांगितले की, देशांतर्गत बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी साखर आयात करण्याची गरज भासल्यावर अमेरिकन बाजारपेठेसाठी साखर कोटा देण्यात काहीच अर्थ नाही. एसआरएने २०२१ मधील पिकांच्या स्थितीवर आगामी २०२२ साठी धोरण ठरविण्यास सुरुवात केली आहे.

लमात यांनी यापूर्वीही अमेरिकेला मंजूर केलेला साखर कोटा रद्द केला असल्याच्या गोष्टीवर भर दिला. ते म्हणाले, जेव्हा देशात साखरेचे उत्पादन स्थानिक गरजांची पूर्तता करीत नाही, अशा स्थितीत हा कोटा रद्द केला गेला आहे. आम्ही एसआरएके पुन्हा असा निर्णय घेण्याचा आणि स्थानिक बाजारपेठेला प्राधान्य देण्याचा आग्रह धरत आहोत. गेल्यावर्षी एसआरएने अमेरिकेनसाठीचा सात टक्के निर्यात कोटा रद्द केला होता. या निर्णयानुसार देशातील साखर उत्पादन शंभर टक्के देशांतर्गत बाजाराच जाईल. चालू हंगामात साखर उत्पादनाचे उद्दिष्ट २.१९ मिलिटन मेट्रिक टनाच्या आधीच्या अंदाजापेक्षा २.१०१ मिलियन मेट्रिक टनापर्यंत समायोजित करण्यात आले आहे. साखर हंगाम दरवर्षी सप्टेंबरमध्ये सुरू होतो आणि ऑगस्टमध्ये त्याची समाप्ती केली जाते.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here