मनिला : युनायटेड शुगर प्रोड्यूसर्स फेडरेशनने (यूएनआयएफईडी) बायोइथेनॉल कन्सल्टेटिव्ह बोर्डाच्या (बीसीबी) व्हर्च्युअल बैठकीत जोरदार विरोध केला. फिलीपींसच्या इथेनॉल प्रोड्यूसर्स असोसिएशन ऑफ फिलीपींसच्या (ईपीएपी) मोलॅसिस आयातीच्या आवाहनाला आक्षेप घेण्यात आला. युनिफेडचे अध्यक्ष मॅन्युअल लमाता यांनी सांगितले की, ईपीएपीच्या या प्रस्तावाला गेल्या काही महिन्यांपूर्वी बीसीबीच्या सदस्यांनी नकार दिला होता. त्यानंतरही त्यांनी प्रतिनिधी जुआन मिगुएल अरोयो यांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जा विभागाच्या हाऊस कमिटीच्या माध्यमातून या मुद्दा मांडण्याचा पर्याय निवडला. बीसीबी मोलॅसिस आयातीचा विरोध करण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याबद्दल लमाता यांनी आनंद व्यक्त केला. कारखान्यांचा हंगाम सुरू असताना झालेल्या या विरोधाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
अरोयोला लिहिलेल्या पत्रात ईपीएपीने उद्योगाच्या पूर्ण बायो इथेनॉल उत्पादन क्षमतेच्या उपयोगासाठी आवश्यक मोलॅसिस आयात करण्यास मंजुरी देण्याबाबत राष्ट्रीय जैव इंधन बोर्डाला फेरविचार करण्याची मागणी केली आहे. युनिफेडचे उपाध्यक्ष निकोलस क्रेमर यांनी या मागणीचा विरोध करताना सांगितले की, आमच्याकडे २,७०,००० मेट्रिक टनाहून अधिक मोलॅसिस आहे. हे मोलॅसिस इथेनॉल उत्पादकांकडून खरेदी केले जाऊ शकते. लमाता यांनी पुढे सांगितले की, जर गेल्या वर्षातील पिकाची आकडेवारी पाहिली तर पुरवठा १.३ मिलियन मेट्रिक टनापर्यंत पोहोचला असून मागणी फक्त १.०९८ मिलियन मेट्रीक टन होती. त्यामुळे पुरवठा कमी असल्याचा इपीएपीचा दावा खोटा आहे. लमाता म्हणाले, इपीएपीने स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जर त्यांना साठवणुकीची समस्या भेडसावत असेल तर ईपीएपीने मोठी साठवण क्षमता तयार केली पाहिजे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link