पिलिभीत: ३८ हजार शेतकऱ्यांचा साखर कारखान्यांना ऊस पुरवठा नाहीच

बिसलपूर : गेल्या हंगामात या समितीच्या क्षेत्रात १.१३ लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ७५ हजार शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केला आहे. जवळपास ३८ हजार शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केलेला नाही. ऊस विभागाचे कर्मचारी या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

सहकारी ऊस समितीकडील नोंदीनुसार, कार्यक्षेत्रात १.१३ लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. ते शेतकरी बिसलपूरच्या शेतकरी सहकारी साखर कारखाना,बजाज हिंदुस्तान साखर कारखाना बरखेडा, द्वारिकेश साखर कारखाना फरीदपूर, बजाज हिंदुस्तान साखर कारखाना मकसूदापुर, दालमिया साखर कारखाना निगोही आणि एलएच साखर कारखाना पिलिभीतला ऊस पुरवठा करतात.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, समितीच्या कार्यक्षेत्रात गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून गाळप सुरू झाले. ३० एप्रिलपर्यंत हंगाम सुरू राहिला. त्यानंतर ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. त्या यादीनुसार जवळपास ३८ हजार शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा केलेला नाही. नोंदीनुसार या शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली होती. ज्या शेतकऱ्यांनी ऊस पिक लावले असेल त्यांनाच समितीचे सदस्य करुन घेतले जाते. त्यामुळे या शेतकऱ्यांचा ऊस कोठे गेला, याचा शोध सुरू करण्यात आला आहे. आता यादी तयार झाल्यानंतर याची पडताळणी केली जाणार आहे. ऊस विभागाच्या म्हणण्यानुसार, बिसलपूर नगर, बिलसंडा विभाग, बरखेडा, मधवापुर, ज्योरह कल्याणपूर, टिकरी, जोगी ठेर, पेनिया हिम्मत, पैनिया रामकिशन, दिसोरिया, मोहम्मदपुर, अमृता खास, चुर्रासकतपूर, मानपुर ,बमरोली, करेली, ईटगाव आणि भिकमपूर या गावांचा यात समावेश आहे. या शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात असल्याचे बिसलपूर ऊस विकास समितीचे सहकारी सचिव आर. पी. कुशवाहा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here