पिलिभीत: साखर कारखान्यांनी थकीत बिले देण्याची शेतकऱ्यांची मागणी

पिलिभीत : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम २०२२-२३ समाप्त झाला आहे. तरीही साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३९९.२० कोटी रुपयांची ऊस बिले दिलेली नाहीत, असा आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांपैकी तीन कारखान्यांनी आपला गळीत हंगाम समाप्त करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.

दि टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, चार साखर कारखान्यांपैकी दोन खासगी आहेत तर इतर दोन सहकारी साखर कारखाने युपी को-ऑपरेटिव्ह शुगर मिल फेडरेशनद्वारे चालविले जातात. २५ एप्रिल रोजी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांकडील नव्या रेकॉर्डनुसार, बजाज साखर कारखान्याकडे सर्वाधिक २७२.५८ कोटी रुपये थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांनी ऊस बिलांना उशीर होत असल्याने या कारखान्याला ऊस पाठविण्यास नकारही दिला आहे.

भारतीय किसान युनियनचे (BKU) जिल्हाध्यक्ष मनजित सिंह यांनी सांगितले की, सरकारने युपी ऊस अधिनियमांतर्गत ऊस खरेदीचे पैसे देण्यास उशीर झाल्याबद्दल त्या रक्कमेवर व्याज आकारणीची तरतुद आहे. याची अंमलबजावणी करण्यास सरकार अपयशी ठरले हे दुर्दैवी आहे. बजाज साखर कारखान्याशिवाय, बिलसपूर सहकारी साखर कारखान्यावर ४३.२२ कोटी रुपये, पूरनपूर सहकारी साखर कारखान्यावर ४४.८७ कोटी रुपये थकीत आहेत. दोन्ही सहकारी साखर कारखान्यांनी २३ एप्रिल रोजी हंगाम समाप्तीची घोषणा केली आहे. एलएच शुगर मिलकडे शेतकऱ्यांचे ३८.५३ कोटी रुपये थकीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here