पिपराईच साखर कारखाना १६ ऑक्टोबरला सुरू होणार

121

गोरखपूर : पिपराईच साखर कारखाना १६ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची सर्व ती तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती राज्याचे अप्पर मुख्य सचिव संजय आर. भुसरेड्डी यांनी दिली. पिपराईचसह गोरखपूर बस्ती विभागातील इतर कारखाने सुरू करण्यासाठी ऊसाची उपलब्धता, क्षेत्र यांची निश्चिती करण्यात आली आहे. कारखाने सुरू केल्यानंतर अडचणी येऊ नयेत याची दक्षता घेतली जात आहे.

अप्पर मुख्य सचिवांनी सर्किट हाऊसवर विभागातील सर्व ऊस आणि अबकारी विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. जर काही छोट्या-मोठ्या तांत्रिक अडचणी असतील तर त्या तत्काळ दूर कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले. अप्पर मुख्य सचिवांनी उन्हाळी हंगामातील ऊस लागणीची तयारीबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. सेवराही ऊस संशोधन केंद्र आणि ऊस विभागाने सुरू केलेल्या ऑक्सिजन प्लांटची पाहणी ते करणार आहेत. विभागीय अधिकारी व्ही. के. गोयल यांनी सांगितले की आगामी सणांचा कालावधी लक्षात घेऊन दक्षता घेण्यात येत आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार दरवर्षी ऊसाची बिले देत आहे. मात्र, उसाचे क्षेत्रफळ घटत चालले आहे. याबाबत अप्पर मुख्य सचिव भूसरेड्डी यांनी सांगितले की, आडसाली आणि उन्हाळ्यातील ऊस लागणीबाबत खास लक्ष दिले जावे. शेतकऱ्यांच्या अडचणी वेळेवर सोडविल्या जाव्यात. तरच उसाचे क्षेत्र वाढेल. कारखान्यांना पुरेसा ऊस मिळेल आणि गळीत हंगाम पूर्ण होईल. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जावे. उसाच्या शेतीपासून शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करू शकतात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here