गहू निर्यातबंदी वादावर पियूष गोयल यांचे स्पष्टीकरण; कमजोर आणि शेजारी देशांसाठी निर्यात सुरूच ठेवणार

नवी दिल्ली : गहू निर्यातीवरील निर्बंध तत्काळ हटविण्याचा भारताचा कोणतीही विचार नाही असे वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्यामुळे जे देश कमकुवत आहेत आणि शेजारी आहेत अशा देशांना गहू निर्यात करण्यास अनुमती दिली जाईल, असे गोयल म्हणाले. स्वित्सर्लंडमध्ये दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना केंद्रीय मंत्री गोयल यांनी जागतिक स्तरावरील अस्थिरतेचा दाखला देत सांगितले की, जर भारताने निर्धंब हटवले तर यातून केवळ काळाबाजार करणारे, साठेबाज आणि सट्टेबाजांना मदत मिळेल. गरजू देशांना याचा काहीच लाभ होणार नाही.

भारत डॉट रिपब्लिकवर्ल्ड डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार पीआयबीने सांगितले की, यावर्षी गव्हाच्या उत्पादनात ७ ते ८ टक्के वाढीची अपेक्षा होती असे गोयल म्हणाले. मात्र, प्रचंड उष्णतेमुळे उत्पादनाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या जे उत्पादन होत आहे, ते देशांतर्गत वापरासाठी पुरेसे आहे. ट्वीटरवर गोयल यांनी गव्हाच्या निर्यातबंदीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, भारताकडून गरजू, शेजारी देश आणि कर्जदार देशांसाठीची गहू निर्यात सुरूच राहील. भारताने दोन वर्षांपूर्वी गव्हाची निर्यात सुरू केली आहे. आणि हा देश आंतरराष्ट्रीय गहू बाजारातील पारंपरिक देश नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी ७ एलएमटी गहू निर्यात करण्यात आला होता. त्यातही रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, सर्वाधिक निर्यात झाली आहे असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here