देशाची तेल आयात कमी करण्यासाठी आराखडा

नई दिल्ली: देशाचे तेल आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्रालय, विविध केंद्रीय मंत्रालये / राज्य सरकारे / संबंधिताच्या समन्वयाने प्रयत्न करत आहे. तेल आणि नैसर्गिक वायुचे देशांतर्गत उत्पादन वाढवणे, ऊर्जा क्षमता आणि उत्पादकता वाढवणे, जैव इंधनाला प्रोत्साहन, पर्यायी इंधनाचा वापर करुन तेल आयात कमी करण्याचे धोरण आहे.

देशात तेल आणि नैसर्गिक वायुच्या साठ्यांचा शोध आणि उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. धोरण शिथिल करणे, हायड्रोकार्बन संसाधनांची पुनर्मुल्यांकन इत्यादींचा यात समावेश आहे.

केंद्र सरकारने 2009 मधे तेल आणि नैसर्गिक वायु साठ्यांचा शोध आणि परवाना धोरणात महत्वाच्या सुधारणांना मंजुरी दिली.

(Source: PIB)

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here