उत्तर प्रदेशात १३ नव्या डिस्टिलरी स्थापन करण्याची योजना

60

लखनौ : उत्तर प्रदेशातील देवरिया, अमरोहा, रामपुर, लखीमपुर खीरी, गोरखपुर, सीतापुर, बरेली और शाहजहांपूरमध्ये २०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने नव्या तेरा डिस्टिलरी स्थापन करण्यात येत असल्याचे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.

राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (आबकारी) संजय भूसरेड्डी यांनी सांगितले की, या डिस्टलरींची कोनशिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच एका खास शिलान्यास समारंभात ठेवली होती. यातून राज्याला अतिरिक्त महसूल मिळणार आहे. उत्तर प्रदेशात गेल्या पाच वर्षात सुमारे ६,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीनंतर डिस्टलरींची संख्या ६१ वरुन वाढून
७८ झाली आहे. यातून अल्कोहोल उत्पादन क्षमता १७० वरुन वाढून २७० कोटी लिटर (२७० crore bulk litres) झाली आहे आणि इथेनॉलचे उत्पादनही ४२ वरुन वाढून ११५ कोटी लिटर (११५ crore bulk litres) झाले आहे.

भूसरेड्डी यांनी सांगितले की, राज्यात माफिया राज, भ्रष्टाचार संपुष्टात येवून आणि सुधारणा झाल्यामुळे उत्पादन वाढले आहे. ते म्ह्णाले की, आता राज्याला अल्कोहोल निर्यातदार बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here