देशातील प्रमुख बंदरांनी नवे विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत प्रमुख बंदरांनी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये गेल्या वर्षीच्या उलाढालीच्या तुलनेत 10.4%ची वाढ नोंदवत मालवाहतुकीच्या पूर्वनिर्धारित उद्दिष्टांची पूर्तता करून नवे विक्रम नोंदवत केलेल्या कामगिरीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

सुमारे 795 दशलक्ष टनांची मालवाहतूक ही देशाच्या प्रमुख बंदरांनी केलेली ऐतिहासिक कामगिरी आहे.
या विक्रमी कामगिरीची माहिती देण्यासाठी केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी “अप्रतिम” अशा शब्दात ट्विट संदेशाद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here