पीएम किसान पोर्टल : शेतकरी करू शकणार थेट तक्रार, सरकार देणार सुविधा

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तक्रार निवारण पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने छत्तीसगढमध्ये या प्रोजेक्टची चाचणीही सुरू केली आहे. पोर्टलवर शेतकरी आपल्या सूचनाही नोंदवू शकतात. एक जानेवारीपासून हे पोर्टल देशात लाँच केले जावू शकते. शेतकऱ्यांसाठी ही एक खुशखबरी आहे.

छत्तीसगढमध्ये याची चाचणी सुरू आहे. बियाणे, खते, पिक विमा अथवा इतर विषयांशी संबंधीत तक्रारी येथे करता येतील. पिक विमा मिळाला नसेल तरी त्याविषयी कार्यवाही होऊ शकते. बियाणे, खते मिळाली नसल्यासही शेतकरी आपली समस्या नोंदवू शकतात.

नवी दुनियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सोडवणुकीसाठी तक्रार निवारण पोर्टल आणण्याचे निश्चित केले होते. शेतकरी या पोर्टलवर एसएमएस, कॉल अथवा अॅपद्वारे तक्रारी नोंदवू शकतात. त्यांच्या सोडवणुकीसाठी त्रिस्तरीय यंत्रणा तयार करण्यात आली आहे. सध्या शेतकरी पीएम किसान योजनेच्या १३ व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. या महिन्याच्या अखेरीस पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येवू शकतात. ज्या शेतकऱ्यांचे पैसे केवायसी अथवा इतर कारणांनी अडकले आहेत, त्यांनी जवळच्या सीएससी केंद्रात जावून ई-केवायसी करावी अथवा pmkisan.gov.in च्या माध्यमातूनही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here