पीएम किसान: पंतप्रधान मोदी यांनी जारी केला किसान सन्मान निधीचा नववा हप्ता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा नववा हप्ता जारी केला. या अंतर्गत ९.७५ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना १९,५०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. या वेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थित होते. पंतप्रधानांनी लाभार्थी शेतकऱ्यांशीही यावेळी संवाद साधला.

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात. तीन समान हफ्त्यांमध्ये २००० रुपये थेट बँक अकाउंटमध्ये दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत १.३८ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी १४ मे रोजी योजनेचा आठवा हप्ता अदा केला होता.

जर तुमच्या अकाउंटमध्ये योजनेचे पैसे आले आहेत की नाही हे तपासायचे असतील तर https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जावे. तेथे फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करावे. नव्या पेजवर बेनिफिशरी स्टेटसचा ऑप्शन मिळेल. तेथे क्लिक करुन आलेल्या पेजवर तुम्हाला आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. या क्रमांकावरुन आपल्याला पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळेल.

दरम्यान, सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे शेतकरी योजनेसाठी पात्र नाहीत. याशिवाय, डॉक्टर, इंजिनीअर, सीए आणि दहा हजार रुपयांहून अधिक निवृत्तीवेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही योजनेत समावेश करण्यात आलेला नाही.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here