प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना: वार्षिक 6000 रुपये मिळणार्‍या यादीत असे पहा आपले नाव

7613

पीएम नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये छोटे आणि सीमांत शेतकर्‍यांना आर्थिक सहकार्य देण्यसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी नावावरुन योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत योग्य शेतकर्‍यांना प्रत्येक वर्षी 3 टप्प्यात 6000 रुपये दिले जात आहेत. आता या योजनेसाठी नवे आर्थिक वर्ष सुरु झाले आहे, अशामध्ये 2020 साठी सरकारची वेबसाईट pmkisan.gov.in यावर नवीयादी अपलोड होत आहे. जर आपण अर्ज केला असेल आणि आपल नाव यादीत आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर या वेबसाईटवर आपलं नाव चेक करु शकता.

आपण लाभार्थी म्हणून या योजनेत आपले नाव पाहू इच्छीत असाल तर आपल्यासाठी सरकारने ही सुविधा ऑनलाईनवर प्रस्तुत केली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी शेतकर्‍यांच्या नावाची सूची येणार्‍या मे पर्यंत जाहीर करेल.

वर दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करुन मेन्यू मध्ये जावून फार्मर कॉर्नर वर जावे. लाभार्थी सूची च्या लिंकवर क्लिक करावी. आपले राज्य, जिल्हा उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव ही माहिती भरावी. यानंतर आपल्याला गेट रिपोर्ट वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्याला सर्व माहिती मिळेल. ज्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ सरकारकडून दिला गेला आहे, त्यांचेही नाव राज्य/जिल्हावार/तहसील/गावागप्रमाणे पाहू शकता. यामध्ये सरकारने सर्व लाभार्थ्यांची पुर्ण सूची अपलोड केली आहे.

जर आपला अर्ज कोणत्याही कागदपत्रासाठी (आधार, मोबाइल नंबर किंवा बँक खाते)थांबलेले आहे तर तो कागद देखील तुम्ही ऑनलाइन अपलोड देखील करु शकता. जर तुम्ही शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घेणार असार तर तुम्ही या वेबसाईल ची मदत घेवून आपला नाव तिथे जोडू शकता. इतकेच नाही तर आपल्या अर्जाची स्थिती काय आहे, याची माहिती शेतकरी आधार संख्या/बँक खाते/मोबाइल नंबर च्या आधारावरही माहिती करुन घेवू शकता.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here