पीएम किसान योजना: शेतकऱ्यांनी या चुका टाळाव्यात, अन्यथा बसेल फटका

केंद्र सरकारच्यावतीने आणि विविध राज्य सरकारांच्यावतीने शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे. ग्रामीण भागातील पात्र व्यक्तीच्या बँक खात्यावर आर्थिक मदत दिली जात आहेत. यासाठी राज्यांव्यतिरिक्त केंद्र सरकारही अनेक योजना राबवत आहे. त्याचा उद्देश प्रत्येक गरीबाला मदत करणे हा आहे. अशा शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांत प्रत्येकी २,००० रुपयांचे तीन हप्ते म्हणजेच वार्षिक एकूण सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत १२ हप्ते आले असून, सर्व लाभार्थी १३ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मात्र योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही चुका टाळल्या पाहिजे. तरच शेतकऱ्यांना मिळणारे हप्त्याचे पैसे अडकू शकतात. सध्या अनेक शेतकरी आहेत ज्यांनी आजपर्यंत जमिनीची पडताळणी केलेली नाही. तुम्ही पीएम किसान योजनेशी संबंधित असाल तर अशी चूक करू नका. अन्यथा हप्त्याचे पैसे डकू शकतात. योजनेसाठी पात्र नसतानाही काहीजण चुकीच्या पद्धतीने योजनेत सामील झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. जर चुकीच्या मार्गाने हप्ता घेत असाल तर तुम्ही तो परत करावा. यासाठी ऑनलाइन नाव तपासा. अन्यथा, तुम्हाला लवकरच सरकारकडून वसुलीची नोटीस मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here