पीएम किसान योजना : निम्म्याहून अधिक शेतकरी १३ वा हप्ता मिळविण्याच्या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ, जाणून घ्या तपशील

केंद्र सरकारने छोट्या, अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना राबवली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात. ही रक्कम लाभार्थ्यांना दोन – दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. थेट त्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या या रक्कमेतून शेतकरी शेतीसाठीचा खर्च करू शकतात. या पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत १२ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. लवकरच १३ वा २,००० रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, १३ वा हप्ता मिळण्याची प्रक्रिया नेहमीपेक्षा वेगळी आहे. बहुतांश शेतकऱ्यांना याची माहिती नाही. लाभार्थ्यांना आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी ई-केवायसी आणि जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी करणे अनिवार्य आहे. जे नवीन शेतकरी या योजनेत आपले नाव नोंदवू इच्छितात, त्यांना आपल्या शिधापत्रिकेचा क्रमांकही जमा करावा लागेल. ई केवायसी आणि जमिनीच्या कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन ज्यांनी केले असेल, अशा लोकांच्या खात्यामध्येच १३ वा हप्ता जमा होईल असे केंद्र सरकारने निर्देश दिले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण न करणारे १.८६ कोटी शेतकऱ्यांची नावे या प्रक्रियेतून वगळण्यात आली आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील २१ लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे रद्दबातल केल्यानंतर आता त्यांना नोटीस बजावून यापूर्वी घेतलेले पैसेही त्यांच्याकडून मागविण्यात येते आहेत. ई केवायसी प्रक्रिया तुम्ही स्वतः pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावून सेल्फ व्हेरिफिकेशनद्वारे करू शकता अथवा ई मित्र केंद्र तसेच सीएससी सेंटरवरही याची सुविधा देण्यात आली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक हेल्पलाइनही जारी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here