पीएम किसान योजना : या दिवशी मिळू शकेल योजनेचा १३ वा हप्ता

देशात आजही अनेक शेतकरी असे आहेत, की ज्यांना शेती करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांची ही स्थिती लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारांच्यावतीने विविध योजना चालविल्या जातात. या योजनांतून शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करणे आणि त्यांना आर्थिक सहाय्य देणे हा उद्देश असतो. याच अनुषंगाने २०१८ पासून सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेला सुरुवात आहे. वार्षिक तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. प्रत्येक हप्त्यामधून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये दोन हजार रुपये जमा केले जात आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांना योजनेचे १२ हप्ते देण्यात आले आहेत.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केंद्र सरकार देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा १३ वा हप्ता जानेवारी २०२३ मध्ये देऊ शकते असे विविध प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. अर्थात याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जर तुम्हाला कोणत्याही अडचणीविना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा १३ वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला योजनेत तुमच्या रेशनकार्डची प्रत जमा करावी लागेल. यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर अधिक माहिती मिळू शकते. जर तुम्ही केवायसीची पूर्तता केली नसेल तर अडचणी येऊ शकतात. योजनेचा हप्ताही रखडू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here