भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या कालावधीत झालेल्या 100व्या G20 बैठकीचे पंतप्रधानांनी केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या G20 अध्यक्षीय कालावधी दरम्यान झालेल्या 100 व्या G20 बैठकीचे कौतुक केले आहे.

G20 इंडियाच्या ट्विट मालिकेला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की-

“‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या तत्त्वाने मार्गदर्शित आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या आमच्या मूल्याच्या अनुषंगाने, भारताच्या G20 अध्यक्षीय कारकिर्दीने जगाचे कल्याण वृद्धींगत करण्यासाठी आणि एक चांगले विश्व निर्माण करण्यासाठी कार्य केले आहे.”

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here