वुहान बचाव कार्याची पंतप्रधानांकडून प्रशंसा

110

चीनमधील वुहान येथे अडकलेल्या भारतीयांची सुखरूप सुटका करण्याच्या अभियानात सहभागी झालेले एअर इंडिया आणि आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची योगदानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. या अभियानात सहभागी झालेल्या सदस्यांना पंतप्रधानांनी एक प्रशंसापत्र जारी केले आहे. नागरी उड्डाण राज्यमंत्री हे प्रशंसा पत्र या अधिकाऱ्यांच्या हाती सुपूर्द करतील.

कोरोना विषाणू संसर्गाचे केंद्र असलेल्या वुहान शहरातून एअर इंडियाने आपतकालीन बचावकार्य हाती घेतले होते. वुहान येथील गंभीर परिस्थितीतही एअर इंडियाने दोन बी-747 विमानांमधून एअर इंडिया आणि आरोग्य मंत्रालयाची पथके 31 जानेवारी 2020 रोजी पाठवली होती.

(Source: PIB)

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here