पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये 7800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी करुन ते राष्ट्राला करतील समर्पित

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर 2022 रोजी पश्चिम बंगालला भेट देतील. सकाळी 11:15 वाजता पंतप्रधान हावडा रेल्वे स्थानकावर पोहोचतील. तिथे हावडा ते न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला ते हिरवा झेंडा दाखवतील. कोलकाता मेट्रोच्या पर्पल लाईनच्या जोका-तरताला मार्गाचे उद्घाटनही करतील आणि विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करुन ते राष्ट्राला समर्पित करतील. पंतप्रधान, दुपारी 12 वाजता, आयएनएस नेताजी सुभाष येथे पोहोचतील. तिथे ते नेताजी सुभाष यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतील नंतर डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी – राष्ट्रीय जल आणि स्वच्छता संस्थेचे (डीएसपीएम – एनआयडब्लूएएस) उद्घाटन करतील. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियाना अंतर्गत ते पश्चिम बंगालमधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी करुन ते राष्ट्राला समर्पित करतील. दुपारी 12:25 च्या सुमारास पंतप्रधान राष्ट्रीय गंगा परिषदेच्या दुसऱ्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील.

आयएनएस नेताजी सुभाष येथे पंतप्रधानांची भेट

देशातील सहकारी संघराज्यवादाला चालना देण्यासाठीचे आणखी एक पाऊल म्हणून, पंतप्रधान 30 डिसेंबर 2022 रोजी कोलकाता येथे राष्ट्रीय गंगा परिषदेच्या (एनजीसी) दुसऱ्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. या बैठकीला केंद्रीय जलशक्ती मंत्री, परिषदेचे सदस्य असलेले इतर केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड तसेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणाला प्रतिबंध करणे तसेच नदी प्रवाहाच्या पुनरुज्जीवनाची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय गंगा परिषदेला देण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियाना अंतर्गत (एनएमसीजी) 990 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केलेल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या 7 पायाभूत सुविधा प्रकल्पांचे (20 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि 612 किमी नेटवर्क) उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. या प्रकल्पांमुळे नबद्वीप, कचराप्रा, हलिशर, बज-बज, बॅरकपूर, चंदन नगर, बांसबेरिया, उत्तरपारा कोत्रंग, बैद्यबाती, भद्रेश्वर, नैहाटी, गारुलिया, टिटागड आणि पानीहाटी या महापालिकांना फायदा होईल. या प्रकल्पांमुळे पश्चिम बंगाल राज्यात सांडपाणी प्रक्रियेची क्षमता 200 एमएलडी पेक्षा जास्त वाढेल.

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियाना अंतर्गत (एनएमसीजी) अंदाजे 1585 कोटी रुपयांच्या खर्चाच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या 5 पायाभूत सुविधा प्रकल्पांची (8 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि 80 किमी नेटवर्क) पायाभरणी देखील पंतप्रधान करणार आहेत. या प्रकल्पांमुळे पश्चिम बंगालमध्ये 190 एमएलडी नवीन एसटीपी क्षमतेची भर पडेल. या प्रकल्पांचा फायदा उत्तर बॅरकपूर, हुगळी-चिन्सुरा, कोलकाता केएमसी क्षेत्र- गार्डन रीच आणि आदि गंगा (टोली नाला) तसेच महेस्ताळा शहराला होईल.

कोलकाता येथील डायमंड हार्बर रोड, जोका येथे सुमारे 100 कोटी रुपये खर्चून विकसित केलेल्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी – राष्ट्रीय जल आणि स्वच्छता संस्थेचे (डीएसपीएम – एनआयडब्लूएएस) उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. ही संस्था देशातील पाणी, स्वच्छता आणि स्वच्छता (डब्लूएएसएच, वॉश) या विषयावरील सर्वोच्च संस्था म्हणून काम करेल. ती केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारांसाठी माहिती आणि ज्ञानाचे केंद्र म्हणून काम करणार आहे.

हावडा रेल्वे स्थानकाला पंतप्रधानांची भेट

हावडा रेल्वे स्थानकावर हावडा ते न्यू जलपाईगुडी यांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. ही अत्याधुनिक सेमी हाय स्पीड रेल्वेगाडी अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहे. मालदा टाउन, बारसोई आणि किशनगंज स्थानकांवर ही गाडी थांबेल.

जोका-एस्प्लेनेड मेट्रो प्रकल्पाच्या (पर्पल लाईन) जोका-तराताला मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान करतील. जोका, ठाकुरपुकुर, साखर बाजार, बेहाला चौरस्ता, बेहाला बाजार आणि तरातला या 6 स्थानकांसह 6.5-किमी लांबीचा हा भाग 2475 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आला आहे. कोलकाता शहराच्या दक्षिणेकडील भाग जसे की सरसुना, डाकघर, मुचीपारा आणि दक्षिण 24 परगणा इथल्या प्रवाश्यांना या प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे मोठा फायदा होणार आहे.

कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान चार रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. यामध्ये 405 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या बोईंची – शक्तीगड तिसरा मार्ग; 565 कोटी रुपये खर्चून विकसित केलेला डनकुनी – चंदनपूर चौथा मार्ग प्रकल्प; 254 कोटी रुपये खर्चून विकसित निमतिता – नवीन फरक्का दुहेरी मार्ग; आणि अंबारी फलकाटा – न्यू मायनागुरी – गुमानीहाट दुहेरीकरण प्रकल्प जो 1080 कोटींपेक्षा जास्त खर्च करून विकसित केला आहे यांचा समावेश आहे.

न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक, 335 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केले जाणार आहे, पंतप्रधान डिसेंबरमध्ये याच्या पुनर्विकासाची पायाभरणीही करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here