संकटातून मिळवू नवी ऊर्जा: ५ एप्रिलला घरोघरी दिवा लावण्याचे आवाहन – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली :कोरोनाची लढाई एकटा कसा लढू असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे. किती काळ ही परिस्थिती राहणार हे सर्वांच्या मनात आहे. पण आपण घरात असलो तरी एकटे नाही, सामूहिक शक्तीने आपण कोरोनाचा मुकाबला करत आहोत. देश ही इतकी मोठी लढाई लढताना आपल्या शक्तीचे दर्शन वारंवार घडवून देत आहे. आपला मार्ग अधिक स्पष्ट करतो. कोरोना संकटामुळे गरीब जास्त प्रभावित झाले आहेत. या संकटातून त्यांना नवीन ऊर्जा मिळवून द्यायची आहे असे त्यांनी सांगितले. तसेच ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता देशाच्या प्रत्येक घरात दरवाजे आणि बालकनीत उभे राहून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी केले आहे.

प्रकाशाच्या महाशक्तीमुळे आपण या युद्धाशी लढतोय आपण एकटे नाही तर १३० कोटी जनता एकाच संकल्पतेने लढतोय हे कळेल असे नरेंद्र मोदींनी सांगितले. कोविड-१९ शी दोन हात करण्यासाठीच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सींग च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
यापूर्वी २४ मार्च ला देशाला संबोधित करत असताना प्रधानमंत्री यांनी देशातील कोरोना वायरसचा प्रसार रोखावा यासाठी २१ दिवसांच्या लाकडाउनची घोषणा केली होती.
व्हिडिओ संदेश देताना ते म्हणाले, रविवारी रात्री ९ वाजता आपल्या सर्वांची ९ मिनिटे मला हवी आहेत. या काळात घरातील बाल्कनीमध्ये उभे राहून मेणबत्ती, बॅटरी, दिवा किंवा मोबाइल ची बॅटरी सुरु करा. यावेळी घरातील सर्व लाइट बंद करावेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here