नीति आयोग पैनल ने केली ऊस दराला साखर दरांशी जोडण्याची शिफारस

नवी दिल्ली : साखर उद्योग संकटातून जात आहे आणि कोरोना मुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. नीति आयोग टास्क फोर्स ने साखर उद्योगाच्या आर्थिक आरोग्यला सुधारण्यासाठी ऊसाच्या किंमतीना साखरेच्या किंमतींशी जोडण्याची शिफारस केली आहे.

नीति आयोग सदस्य रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली ‘ऊस आणि साखर उद्योग’ यावर पॅनलच्या रिपोर्टला मार्च 2020 मध्ये अंतिम रुप देण्यात आले होते. याला गुरुवारी सरकारी थिंकटैंक निती आयोगाच्या वेबसाइटवर पोस्ट केले गेले. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये ऊस आणि साखर महत्वपूर्ण भूमिका निभावतात.

टास्क फोर्स ने शेतकर्‍यांना आर्थिक प्रोत्साहन देवून ऊसाच्या शेतीच्या काही क्षेत्रांमध्ये पाणी कमी लागणार्‍या पिकांना स्थानांतरित करण्याचीही शिफारस केली आहे. टास्क फोर्स च्या मतानुसार, ऊस शेतकर्‍यांसाठी थकबाकी ची समस्या सोडवणे आणि साखर उद्योगाचे आर्थिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, ऊसाच्या किंमतींना साखरेच्या किंमतींशी जोडणे आवश्यक आहे

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here