ब्राजीलमध्ये इथेनॉल उत्पादनासाठी पुर्तगाल कंपनी गुंतवणूक करणार

85

ब्राजीलीया : जागतिक स्तरावर पेट्रोलियम पदार्थांच्या च्या कमी होणार्‍या किंमतीमुळे जिथे ब्राजील च्या इथेनॉल उत्पादक कारखान्यांनी यावर्षी इथेनॉल चे कमी उत्पादन करणे आणि साखरेचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, तिथे पोर्तुगालच्या एका कंपनीने या दक्षिण अमेरिकी देशामध्ये जैव इंधन इथेनॉल चे उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंवतणुक करण्याची योजना बनवली आहे.

पोर्तुगाल येथल कंपनीच्या टेलुसमैटर ने ब्राजील च्या जैव इंधनाच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची योजना बनवली आहे. यासाठी 5 मार्च ला पोर्तुगाल च्या कंपनीने ब्राजील च्या नॅशनल एजन्सी ऑफ ऑइल, नॅचरल गॅस अ‍ॅन्ड बायोफ्यूल्स यांना एक निवेदन देवून त्या देशामध्ये इथेनॉलचे उत्पादन करण्याचा अधिकार देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

टेलुसमैटर ने ब्राजील आणि अंगोला मध्ये पूर्वीच आपले कार्यालय स्थापन केले आहे. कंपनी मुख्यत्वे इंजिनिअरींग सोल्युशन्स, एलईडी लाइटिंग आणि फ्लीट ट्रैकिंग सारख्या क्षेत्रात सक्रिया आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here