मुंबई : महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात दुष्काळ पडण्याची शक्यता व्यक्त केल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. मंगळवारी कॅबिनेट बैठकीत फडणवीस म्हणाले की, या वर्षी प्रशांत महासागरात अल नीनोची घटना विकसित होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम पावसावर होऊ शकतो. मान्सूनच्या पावसाल फटका बसल्यास राज्यात दु्ष्काळी स्थिती निर्माण होऊ शकते. फडणवीस यांची ही टिप्पणी पाण्याची उपलब्धता आणि दुष्काळाचा कृषी क्षेत्रावर होणारा प्रभाव कमी व्हावा यासाठी प्रशासनाला अलर्ट करण्यासाठी करण्यात आली आहे. दुसरीकडे आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, सध्या फक्त महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशातील मान्सूनच्या पावसाबाबत कोणतीही भविष्यवाणी करणे धोक्याचे ठरेल. सिंचन विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या राज्यातील जलाशयांमध्ये त्यांची एकूण क्षमतेच्या ७०.१६ टक्के पाणी आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत हा पाणीसाठा ७५.५९ टक्के होता.
जगभरातील हवामान एजन्सींनी आतापर्यंत अल नीनाच्या विकासाची भविष्यवाणी केलेली नाही. भूमध्यरेखीय प्रशांत महासागराच्या तळातील पाणी कधी कधी असामान्य रुपात गरम होते आणि इतर काळात जटील महासागरातील वातावरणासंबंधी कारणांमुळे ते असामान्य रुपात थंड असते. या दोन्हीचा जागतिक हवामानाच्या स्थितीवर प्रभाव पडतो. आत्तापर्यंत, पृष्ठभावगावरील पाणी सामान्यपेक्षा थंड आहे, ज्याचे वर्णन ला निना असे केले गेले आहे. खरे तर हा टप्पा आता जवळपास तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, अमेरिकेतील नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फिअरिक अॅडमिनीस्ट्रेशनच्या (एनओएए) पूर्वानुमान केंद्राच्या मतानुसार, ला नीनाची स्थिती आता कमजोर होत आहे. आणि पुढील काही महिन्यांपर्यंत तटस्थ राहण्याची शक्यता आहे. फडणवीस यांची टिप्पणी केवळ राज्य सरकारला खराब स्थितीशी सामना करण्यासाठी तयार राहण्याचा सल्ला म्हणून पाहता येईल.