ब्राझीलमध्ये साखर उत्पादन वाढण्याची शक्यता

151

साओ पाउलो : कोरोना वायरसमुळे तेल उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच इथेनॉलसारख्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी ब्राझीलने देखील इथेनॉलचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता येथील साखर कारखान्याच्या उत्पादनासाठी अधिक ऊस वाटप करेल.

ब्राझीलला 2020-21 हंगामामध्ये देशामध्ये 35.3 मिलियन टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. जी गेल्या पीकाच्या तुलनेत 18.5 टक्के अधिक आहे. कारखाने साखर बनवण्यासाठी अधिक आणि जैव इंधन इथेनॉल चे उत्पादन करण्यासाठी कमी ऊस वाटप करत आहे. ज्यामुळे साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. ब्राझीलच्या या निति मुळे भारतासह इतर साखर उत्पादक देश प्रभावित होवू शकतात. जे पुर्वीपासूनच अतिरिक्त साखर आणि ठप्प झालेल्या निर्यातीमुळे अडचणींचा सामना करत आहेत. साखर उत्पादन वाढवण्यामुळे वैश्‍विक बाजारामध्ये साखरेच्या दरांवर दबाव दिसेल. ज्याचा थेट परिणाम येणार्‍या महिन्यामध्ये भारतासह सर्व साखर उत्पादक देंशांवर दिसू शकतो.

ब्राझीलच्या कृषी सांख्यिकी एजंसी कोनाब कडून मंगळवारी जारी केलेल्या शक्यतांनुसार, एकूण पीक 630.7 मिलियन टन आहे, जे गेल्या हंमागातील तुलनेमध्ये 1.9 टक्के कमी आहे. दूसरीकडे इथेनॉलचे उत्पादन 32 बिलियन लीटर कमी होण्याचे अनुमान आहेत , जे 10.3 टक्के कमी आहे. ब्राजीलचे कारखाने राष्ट्रव्यापी लॉकडाउनमुळे इंधनाच्या मागणीमध्ये घट झाल्यानंतर ते ऊसाला साखर उत्पादनाकडे स्थानांतरित करत आहेत. कोनाब चा अंदाज आहे की, 2019-20 मध्ये ब्राझीलमध्ये साखर उत्पादनासाठी केलेले ऊस वाटप गेल्या हंगामाच्या 34.9 टक्क्याच्या तुलनेत या हंगामात वाढून 42.4 टक्के होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here