नुरपुरमध्ये नवा साखर कारखाना स्थापन होण्याची शक्यता

बिजनौर : नुरपूर विभागात नवा साखर कारखाना उभारणीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती ऊस विकास आणि साखर उद्योग विभागाचे मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी भाकियू अराजकीयच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी या शिष्टमंडळाने मुख्य सचिवांसमोर साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेचा मुद्दाही उपस्थित केला. लखनौमधून परतलेल्या भारतीय किसान युनियन अराजकीयचे युवा प्रदेशाध्यक्ष दिगंबर सिंह यांनी सांगितले की, मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांना शिष्टमंडळात सहभागी झालेल्या नेत्यांच्यावतीने दिल्या गेलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युनियनने अनेक वेळा राज्यातील नव्या साखर कारखान्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. बिलाईतील बजाज साखर कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांना ऊस बिले दिलेली नाहीत.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शिष्टमंडळाने यावेळी नजिबाबदच्या किसान सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वृद्धी आणि डिस्टिलरी स्थापन करण्याबाबत प्रश्न मांडला. काही साखर कारखाने तथा समुहांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५० टक्क्यांहून कमी ऊस बिले दिली आहेत, याबाबतही विचारणा केली. राज्यातील बजाज समुहाचा मवाना साखर कारखाना, सिंभावली साखर कारखाना, मोदीनगर मलकपुरसह साखर कारखान्यांची ऊस बिले देण्याबाबतची स्थिती अतिशय वाईट आहे. त्य़ामुळे सरकारी देणी देताना शेतकऱ्यांना डिफॉल्टर व्हावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळात भारतीय किसान यूनियन (अराजकीय)चे राष्ट्रीय मीडिया प्रभारी धर्मेंद्र मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते हरिनाम सिंह वर्मा, दीपक तोमर आदी शेतकरी सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here