फिलिपाईन्समध्ये साखर तुटवड्याची शक्यता : USDA

मनिला : अमेरिका आणि जागतिक स्तरावरील बाजारपेठांना साखर निर्यात रद्द करण्याच्या निर्णयानंतरही फिलिपाईन्सला साखर तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो. प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, अमेरिकेन कृषी विभागाने (यूएसडीए) प्रकाशित केलेल्या नव्या अहवालानुसार, फिलिपाईन्समध्ये २०२२ मध्ये कच्च्या साखरेचे उत्पादन २.१ मिलियन टन होण्याची शक्यता आहे. हे उत्पादन २०२१ मध्ये झालेल्या २.१४ मिलियन टनापेक्षा कमी आहे. नव्या पुर्व अनुमानानुसार देशांतर्गत खपही कमी आहे. यूएसडीएने देशांतर्गत खप २.२ मिलियन टन होण्याची शक्यता वर्तवली होती. फिलिपाईन्समध्ये सप्टेंबर महिन्यात साखरेचा हंगाम सुरू होतो आणि ऑगस्ट महिन्यात त्याची समाप्ती होते.

या वर्षीच्या सुरुवातीला साखर नियामक प्रशासनाला (एसआरए) फिलिपाईन्समध्ये पिकाचे उत्पादन कमी होईल याचा आधीच अंदाज आला होता. त्यामुळे एसआरएने ३१ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या साखर आदेशात (एसओ) साखरेचे उत्पादन १०० टक्के देशांतर्गत बाजारपेठेतच वापरण्याचा निर्णय घेतला. फिलिपाइन्सने साखरेच्या उत्पादनाला विविध प्रकारे वर्गीकृत केले आहे. यामध्ये देशांतर्गत साखरेसाठी ‘बी’, अमेरिकेला साखर निर्यातीसाठी ‘ए’, जागतिक अथवा अन्य बाजारपेठेतील निर्यातीसाठी ‘डी’ आणि साठवणुकीसाठी ‘सी’ अशी वर्गवारी आहे. युनायटेड शुगर्स प्रोड्यूसर्स फेडरेशनने एसआरएकडे पुढील पिक हंगाासाठी ए साखरेचा म्हणजे अमेरिकेला निर्यातीचा कोटा रद्द करण्याची मागणी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here