केनियात आगामी काळात साखर तुटवडा शक्य

626

नैरोबी: केनियातील साखर कारखान्यांना आगामी काही महिन्यांत उसाच्या तुटवड्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. परिणामी साखरेचा तुटवडा होण्याची शक्यता आहे.

देशातील साखर उद्योग चुकीचे व्यवस्थापन, भ्रष्टाचार आणि खराब पिक परिस्थितीमुळे संकटातून जात आहे. त्यामुळे सरकारने तोट्यात असलेले पाच सरकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. चेमिलिल, मिवानी, नोजिया, सोनी आणि मुहरोनी साखर कारखाने भाडे तत्त्वावर दिले जातील. जूनच्या अखेरपर्यंत कारखान्यांना ६,७७,५८४ टन उसाच्या तुटवड्याला सामोरे जावे लागेल असे कृषी आणि अन्नधान्य प्राधिकरणाच्या एका अहवालात नमुद करण्यात आले आहे.

डिसेंबर २०२० ते जून २०२१ या कालावधीत साखर कारखान्यांना ५७,६७,६५७ टन उसाची गरज असेल असा अंदाज होता. मात्र, ५०,८४,४१६ टन ऊसच उपलब्ध होऊ शकतो. उसाचा पुरवठा कमी असल्याने साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी साखरेची आयात करण्याची गरज भासू शकते. साखर कारखान्यांना २०२१-२२ या कालावधीत ९९,७१,००० टन ऊसाची गरज भासू शकेल असे सर्वेक्षणात म्हटले आहे. तर ९२,७६,६५७ टन ऊस उपलब्ध होणार आहे. साखर उद्योगाला वाचविण्यासाठी उसाचा तुटवडा कमी करणे, उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here