चीनमध्ये विजेची टंचाई, शेकडो घरे, कारखाने अंधारात

चीनमध्ये वाढत्या वीज पुरवठ्याच्या संकटामुळे अनेक घरांमधील वीज बंद झाली आहे. कारखान्यांतील उत्पादनात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या प्रचंड मोठ्या अर्थव्यवस्थेची संथ गती निर्माण झाली असून जागतिक पुरवठ्याच्या साखळीवरही परिणाम होऊ शकतो.

गोल्डमॅन सॅक्सने चीनचा विकास दर घटण्याचे अनुमान वर्तविले आहे. बीबीसी रिपोर्टच्या हवाल्याने म्हटले आहे की, आगामी काळात चीनला ऊर्जा टंचाईला तोंड द्यावे लागेल. या वर्षी जगातील द्वितीय क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा विकास दर ७.८ टक्के राहील असे अनुमान आहे. यापूर्वी ८.२ टक्के विकास दराचा अंदाज होता. महत्त्वपूर्ण आर्थिक घडामोडींमुळे यात घट होण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम व्यापक प्रमाणावर दिसू शकतात. चीनच्या आर्थिक घडामोडीवर याचा ४४ टक्क्यांपेक्षाही अधिक परिणाम होऊ शकतो.

अहवालात म्हटले आहे की, चीनमध्ये वीज टंचाईच्या तुटवड्यामागे पर्यावरण नियंत्रण, पुरवठ्यावरील नियंत्रण आणि वाढते दर ही कारणे आहेत. अशीच स्थिती राहील्यास अनेक कारखाने बंद पडू शकतात. घरातील वीज पुरवठ्यावरही परिणाम होईल. उत्तर चीनमधील तियानजीन बंदरावर वीज टंचाईचा परिणाम दिसून आला आहे. मोठ्या क्रेनच्या मदतीने जहाजावरून माल उतरून घेण्याचे काम थंडावले आहे. अशी स्थिती आठवडाभर राहील असा अंदाज आहे.
चीनमधील अनेक ठिकाणची विजेची व्यवस्था कोळशावर अवलंबून आहे. जपानच्या प्रसिद्ध अर्थसंस्था असलेल्या नोमुरा आणि वॉल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट बँक मॉर्गन स्टॅनली, चीन इंटरनॅशनल कॉर्पोरेशन संस्थेने याबाबत इशाराही दिला आहे. स्थिती अशीच राहीली तर चीनच्या आर्थिक विकासात घट होऊ शकते असे या संस्थांचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत चीनच्या लिओनिंग, जिलीन आणि हेलोगजियांग प्रांतामध्ये मोठे वीज संकट आहे. त्यामुळे लिफ्ट्स, ट्रॅफिक सिग्नल बंद पडले आहे. लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत. प्रशासनाने लवकर व्यवस्था सुरळीत करण्याचे आश्वासन दिले असले तरी लोकांमध्ये प्रचंड राग आहे. चीन सरकारने वीज पुरवठ्याचा मुद्दा सोडवला नाही तर स्थिती कठीण होईल असे गोल्डमॅन सॅक्सच्या अहवालात म्हटले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here