प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचा Q४ मध्ये ८८१.१५१ मिलियन रुपयांचा PAT

पुणे : प्राज इंडस्ट्रिजने (प्राज) ३१ मार्च, २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीत आणि पूर्ण वर्षासाठीच्या आपल्या लेखापरीक्षण आर्थिक स्थितीची घोषणा केली आहे.

Q४ FY२३ मधील कामगिरीचे पुनरावलोकन (एकत्रित):

परिचालन उत्पन्न १०,०३९.८५४ मिलियन रुपये (Q४ FY२२: रुपये ८३०९.६४३ मिलियन; Q३ FY२३ : रुपये ६४७ मिलियन) मिळाले.

पीबीटी १,१२८.१३३ मिलियन (Q४ FY२२ : रुपये ७८०.६३६ मिलियन; Q३ FY२३: रुपये ८५८.९९७ मिलियन) वर आहे.

PAT ८८१.१५१ मिलियन (Q४ FY२२: रुपये ५७६.५०७ मिलियन; Q३ FY२३: रुपये ६२३.११३ मिलियन) वर आहे.

तिमाही दरम्यान, १०,३८० मिलियनच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

FY२३ मधील कामगिरीचे पुनरावलोकन (एकत्रित): :

परिचालन उत्पन्न ३५,२८०.३७८ मिलियन रुपये (FY२२: २३,४३२.७४४ मिलियन रुपये) झाले.

पीबीटी ३,१८७.२४९ मिलियन रुपये (FY२२: २,०४८.७७२ मिलियन रुपये) झाले आहे.

PAT २,३९८.१८२ मिलियन रुपये (FY२२: रु. १,५०२.४२० मिलियन रुपये) झाले आहे.
३१ मार्च, २०२३ पर्यंत समायोजित ऑर्डर बॅकलॉग ३४,१४० मिलियन (FY२२ ऑर्डर बॅकलॉग २८,७८० मिलियन रुपये) होती.

लाभांश :
संचालक मंडळाने ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षासाठी २ रुपये प्रती इक्विटी शेअरच्या मूल्यावर २२५ % @ ४.५० रुपये प्रती इक्विटी शेअरचा अंतिम लाभांश प्रस्तावित केला आहे. या लाभांश आगामी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत शेअरधारकांच्या अनुमोदनाच्या प्रतीक्षेत आहे.

आर्थिक वर्ष २३ मध्ये सातत्याने चांगली कामगिरी : सीईओ आणि एमडी शिशिर जोशीपुरा

कंपनीच्या कामगिरीवर टिप्पणी करताना, प्राज इंडस्ट्रिजचे सीईओ आणि एमडी शिशिर जोशीपुरा यांनी सांगितले की, आम्ही आमच्या तंत्रज्ञानातील वाढ आणि मजबूत वितरण क्षमतांचा लाभ उठवत आर्थिक वर्ष २३ मध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. एनर्जी ट्रान्झिक्शन अँड क्लायमेट ॲक्शन (ETCA) अजेंड्याने आमच्या इंजिनीअरिंग व्यवसायासाठी नव्या संधी खुल्या केल्या आहेत. ते म्हणाले की, सरफेस मोबिलिटीपासून मोबिलिटी सोल्यूशन्सचा विस्तार, यामध्ये SAF चाही समावेश आहे, हा आमच्या व्यवस्यासाठी संधींचे क्षितिज विस्तारत आहे. आम्ही आपल्या सर्व हितधारकांच्या अपेक्षा पूर्तीसाठी आश्वस्त आहोत. कारण, आम्ही आमचे काम सतत पुढे घेवून जात आहोत.

काही प्रमुख घडामोडी :

प्राजने ‘स्वदेशी’ सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (SAF)च्या मिश्रणाने संचलित भारतातील पहिले व्यावसायिक उड्डाण करण्यासाठी एअर एशिया इंडिया आणि आयओसीएलशी भागिदारी केली आहे. एफटीएफमध्ये मिश्रण केलेल्या SAF चे उत्पादन प्राजद्वारे स्वदेशी फिडस्टॉकचा वापर करुन करण्यात आले आहे.

आयओसीएल पानीपत २ जी प्लांट यशस्वीपणे कार्यरत झाला आहे आणि इथेनॉल उत्पादनही सुरू करण्यात आले आहे.
ETCA सेगमेंटमधील वाढत्या संधी मिळविण्यासाठी प्राजकडून एक नवी सहाय्यक कंपनी Praj GenX Limited मध्ये स्थापन करण्यासाठी सर्वात आधुनिक सुविधांची पुर्तता करीत आहे. नवी सुविधा १००० मिलियन रुपयांच्या कॅपेक्ससह मोठ्या बंदराजवळ उभारली जाईल.

बायो प्लास्टिकच्या व्यवसायीकरणाला गती देण्यासाठी प्राजने पुण्याबाहेरील परिसरात, जेजुरीमध्ये पॉलिलॅक्टिक ॲसिड (पीएलए) साठी आपला पहिला डेमो प्लांट स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. या पायलट सुविधेचा उपयोग खाद्य ग्रेडच्या लॅक्टिक ॲसिड आणि पॉलिलॅक्टिक ॲसिडच्या उत्पादनासाठी केला जाईल.

संचालक मंडळाने विविध प्रकारच्या जैवइंधनाच्या उत्पादनासाठी आयओसीएलसह संयुक्त उपक्रम स्थापन करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. शाश्वत विमान इंधना (SAF) चे उत्पादन हा या संयुक्त उपक्रमाचा पहिला प्रकल्प असण्याची शक्यता आहे.

प्राजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील अनुकरणीय योगदानाबद्दल इंजीनियरिंग काउंसिल ऑफ इंडिया (ईसीआय) उद्योग श्रेणीतील प्रख्यात अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here