पानीपत : पानीपत डाहर येथील नव्या साखर कारखान्यात डिस्टिलरी प्लांट स्थापन करण्याची तयारी सुरू झाली आहे. १५० कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या या प्लांटची क्षमता ९० केएलपीडी असेल.
जागरण डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, नॅशनल शुगर फेडरेशनचे डेप्युटी टेक्निकल ॲडव्हायजर (डीटीए) श्रीवास्तव यांनी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक नवदीप सिंह व इंजिनीअर्ससोबत नव्या आणि जुन्या दोन्ही कारखान्यांचा दौरा केला. त्यानंतर झालेल्या बैठकीत डिस्टिलरी प्लांट स्थापन करण्याबाबत चर्चा झाली. जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कार्यकारी संचालक नवदीप सिंह यांनी सांगितले की, नव्या कारखान्यात डिस्टिलरी ६० केएलपीडी मलाईसस बेस आणि ३० केएलपीडी ग्रीन बेस असेल. हा इथेनॉल बेस्ड प्लांट असेल. प्लांट स्थापन झाल्यानंतर महसूल वाढेल.
देशातील अनेक राज्यांनी इथेनॉल उत्पादनाबाबत महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे इथेनॉल उत्पादनात वाढ झाली आहे.
देशात इथेनॉल पुरवठा वर्ष २०१३-१४ मध्ये फक्त १.५३ टक्के मिश्रणाच्या स्तरावर ओएमसी कंपन्यांना ३८ कोटी लिटर पुरवठा झाला होता. २०१३-१४ पासून २०२०-२१ पर्यंत इंधन ग्रेड इथेनॉल उत्पादन आणि ओएमसींना पुरवठा ८ पट वाढला आहे. आतापर्यंत ओएमसींना ३०२.३० कोटी लिटर इथेनॉल पुरवठा झाला आहे.