युपी : बुलंदशहर जिल्ह्यात तीन ऊस समित्यांच्या निवडणुकीची तयारी सुरू

बुलंदशहर : जिल्ह्यातील तीन सहकारी ऊस विकास समित्यांच्या निवडणुकीच्या तयारी सुरू झाली आहे. जून महिन्यात निवडणूक प्रस्तावित आहे. तर सहकार विभागाने मतदानाची तयारी सुरू केली आहे. एक लाखाहून अधिक मतदार समित्यांमध्ये नोंदवले आहेत. समित्यांवर सरकारकडून एक-एक संचालक नियुक्त केले जातील. ते मतदान करू शकतील, मात्र निवडणूक लढवू शकणार नाहीत. ९४६ महसुली गावे आता पुढील महिन्यात प्रतिनिधी निवड सुरू करतील. प्रत्येक समितीवर किमान नऊ संचालक निवडतील. आणि त्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडले जातील.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस सहकारी समित्यांची निवडणूक मार्च महिन्यात होणार होती. मात्र, सरकारने काही कारणाने ही निवडणूक टाळली होती. जून महिन्यात समित्यांचे निवडणूक होईल. यासाठी अद्याप अधिकाऱ्यांना अधिकृत आदेश मिळालेला नाही. सहकार विभाग निवडणुकीची तयारी करीत आहे. सर्व गावांकडून प्रतिनिधी निवडले जातील. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. सर्वात आधी मतदार यादी तयार केली जाईल. सरकारच्या गाईडलाइन्सनुसार काम होईल असे सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक अनिल राठौर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here