भारतात पहिल्या इथेनॉल गॅस प्लान्टची तयारी

103

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या मदतीने स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियातर्फे महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील आपल्या फेरो अलॉय प्लान्टमध्ये (सीएफरी) भारतातील पहिला इथेनॉल गॅस प्लान्ट बसविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

याबाबत पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, स्टील रिसर्च अँड टेक्नॉलॉजी मिशन ऑफ इंडियाचे (एसआरटीएमआय) डायरेक्टर मुकेश कुमार यांनी सांगितले की, ही योजना कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. देशाचा कच्च्या तेलाच्या आयातीवरील भार कमी करण्याच्या सरकारच्या उद्दीष्टांचीही यात पूर्तता होणार आहे. एसआरटीएमआय गॅसपासून इथेनॉल प्लान्ट तयार करण्यासाठी सेलतर्फे सुविधा दिल्या जात आहेत. या प्लान्टच्या स्थापनेसाठी सेलतर्फे सुमारे ४०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यातील २० टक्के खर्च हा इथेनॉल मिश्रण राष्ट्रीय धोरणाअंतर्गत व्यवहार्य गॅस फंडिंगसाठी सहाय्य म्हणून दिला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here