उत्तर प्रदेशच्या धर्तीवर बिहारमध्ये ऊस दरवाढीची तयारी

पाटणा : बिहारमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. जर योग्य पद्धतीने निर्णय झाला तर शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रती क्विंटल दर मिळू शकतो. सध्या बिहारमध्ये साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३१५ रुपये प्रती क्विंटल दर देत आहेत. खरेतर गेल्या हंगामात राज्यात २९५ रुपये ऊस दर निश्चित करण्यात आला होता. मात्र अलिकडेच उत्तर प्रदेश सरकारने ऊस दरात वाढ केल्याने आता बिहारमध्येही नव्याने ऊस दर निश्चित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

याबाबत बिहार सरकारने उत्तर प्रदेश सरकारशी संपर्क साधला असून ऊस उद्योग विभागाकडून उत्तर प्रदेशातील उसाच्या नवीन दराचा तपशील मागवला आहे. जर ऊस उद्योग विभाग आणि सरकारचे एकमत झाले तर याचा थेट फायदा बिहारमधील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. अलीकडे देशभरात शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारने मंजूर केलेली तीन कृषी विधेयके रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. यावेळी शेतकऱ्यांनी सातत्याने ऊस दरवाढीची मागणीही केली आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी साखर कारखानदारांवर मनमानी कारभार करण्याचा आरोपही केला आहे. नव्या निर्णयामुळे नियमित प्रजातीच्या उसाला ३४० रुपये प्रती क्विंटल दर मिळू शकेल. अर्थात या निर्णयाला राज्य सरकारला शुगर मील असोसिएशनची सहमती मिळवावी लागेल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here