कारखाने सुरू करण्यासाठी ऊस विभागाकडून वेळापत्रक तयार

पीलीभीत : ऊस विभागाने नव्या गाळप हंगामासाठी साखर कारखाने सुरू करण्यासाठीचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. एलएच साखर कारखान्यात २८ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात एलएच साखर कारखाना पिलीभीत, किसान सहकारी साखर कारखाना पूरनपूर, किसान सहकारी साखर कारखाना बिलसपूर आणि बजाज हिंदूस्थान लिमिटेड बरखेडा हे कारखाने सुरू आहेत. २०२१-२२ या गळीत हंगामासाठीची तयारी कारखान्यांनी पूर्ण केली आहे. एलएच साखर कारखान्यात बॉयलर अग्नी प्रदिपनही करण्यात आले आहे. ऊस विभागाने कारखाने सुरू करण्यासाठी वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार, एलएच कारखाना २८ ऑक्टोबरला सुरू होईल. एक नोव्हेंबर रोजी बरखेडा, १२ नोव्हेंबर रोजी पूरनपूर आणि दहा नोव्हेंबर रोजी विलसपूर कारखाना सुरू होईल. जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, एलएच कारखान्याकडून २५ ऑक्टोबरपासून ऊस खरेदी सुरू होईल. यावेळी ऊस संरक्षण समितीची बैठक होणार आहे. जिल्ह्यात एक लाख दोन हजार हेक्टरमध्ये ऊस पिक लागवड आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here