महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

मुंबई : महाराष्ट्रात बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुण्यासह राज्याच्या अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला. भारतीय हवामान विभागाने गुरुवारीही मुंबई, पुणेसह उत्तर महाराष्ट्र, कोकणात हलका ते मध्यम पाऊस कोसळेल अशी शक्यता वर्तवली आहे.

यापूर्वी आयएमडीने पुणे, अहमदनगर, सातारा आणि मराठवाड्यासोबत मुंबई शहर, ठाणे, रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला होता. तर पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबारसह उत्तर मराराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
द हिंदूमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, आयएमडी पुणेच्या हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यप यांनी सांगितले की, जोरदार वारे आणि थंडीच्या वातावरणात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात २ डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. अवकाळी पावसाने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. राज्यातील कृषी क्षेत्रात अवकाळी पावसाने २०१९ पासून अधिक नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here