इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी केले साखर कारखान्याचे उद्घाटन

जकार्ता: इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी गुरुवारी  दक्षिणपूर्व सुलावेसी मध्ये एका नव्या साखर कारखान्याचे उद्घाटन केले. त्यांनी सांगितले की, कोविड 19 मुळे  सध्याची आर्थिक स्थिती पाहता नव्या साखर कारखान्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी खूप अधिक विश्‍वासाची आवश्यकता होती. या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणे आणि व्यवसाय सुरु करण्यासाठी आम्ही गुंतवणूकदारांचे आभारी आहोत.

साखर कारखाना 2017 मध्ये बनवला गेला होता आणि ऑगस्ट मध्ये परिचालन सुरु झाले आहे, याची गाळप क्षमता 12,000 टन प्रति दिन आहे. राष्ट्रपतींनी सांगितले की, आपल्याला या पावलाचा सन्मान करण्याची गरज आहे. जोकोवी यांनी सांगितले की, आम्हाला आशा आहे की, कारखाना व्यवस्थापन कोरोना संकटादरम्यान देशाच्या 15,000 कर्मचार्‍यांना रोजगाराच्या संधी मिळवुन देईल, त्यांनी सांगितले की, घरगुती साखर उत्पादनामुळे देशाची विदेशी मुद्रा वाचवण्यामध्ये मदत मिळू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here