मुंबईतील गोरेगाव येथील लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

मुंबईतील गोरेगाव येथे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख आणि जखमींना 50,000 रुपये अनुदान जाहीर.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे;

“मुंबईच्या गोरेगाव येथे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. शोकग्रस्त कुटुंबियांचे मी सांत्वन करतो. जखमींना लवकर बरे वाटावे अशी मी प्रार्थना करतो. बाधितांना शक्य तेवढी सर्व मदत अधिकारी करत आहेत.पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून

प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here