प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २३ डिसेंबरला वाराणसीत सेंद्रीय शेती परिषदेत करणार मार्गदर्शन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २३ डिसेंबर २०२१ रोजी उत्तर प्रदेशात होणाऱ्या सेंद्रिय शेती परिषदेत मार्गदर्शन करतील. या सेंद्रिय शेती संमेलनात कृषी शास्त्रज्ञ, ज्येष्ठ शेतकरी आणि कृषी तज्ज्ञ सहभागी होतील.

एनआयमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, सूत्रांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाने आपल्या किसान मोर्चाला यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शेतकरी, कृषी वैज्ञानिकांना आमंत्रित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी यासाठी सोशल मीडिया व इतर मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी एक समिती समन्वय करणार आहे. पंतप्रधान मोदी हे १३ डिसेंबर रोजी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करतील.

काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरमध्ये भक्तांसाठी राणी अहिल्याबाई होळकर यांची एक मूर्तीही असेल, त्यांनी एकेकाळी या मंदिराचे पुनर्निमाण केले होते. देशभरात या कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले जाणार आहे. या योजनेसाठी सुमारे ८०० कोटी रुपयांचा खर्च आहे. हे काशी विश्वानाथ मंदिराला गंगा नदीशी जोडेल. पंतप्रधान मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टच्या रुपात ओळखल्या जाणारा हा कॉरिडॉर मंदिर आणि गंगा नदी यादरम्यान जोडला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here