खाजगी कंपनीतही मिळणार दरमहा 24 हजार वेतन; मोदी सरकारचा कायदा

951

कोणत्याही खाजगी कंपनीत आता दरमहा मिळणारे वेतन 24 हजारापेक्षा कमी नसेल, असा आदेश केंद्र सरकारने जारी केला आहे. जर कोणतीही खाजगी कंपनी कर्मचार्‍यांना 24 हजार रुपयापेक्षा कमी वेतन देत असेल तर तक्रार केल्यानंतर सरकार त्या संबंधित कंपनीविरोधी कारवाई करणार आहे.

या निर्णयामुळे कमी वेतन देणार्‍या खाजगी कंपन्यांना चाप बसणार आहे. एखाद्या कर्मचार्‍याला 24 हजारापेक्षा कमी वेतन दिले तर तो कर्मचारी सरकारने नियुक्त केलेल्या अधिकार्‍याकडे तक्रार नोंदवू शकतो.

कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
ते म्हणाले, तब्बल 65 वर्षांनंतर हे घडले. मोदी सरकारने 2017 मध्ये किमान वेतन कायद्यात सुधारणा केल्या. यामुळे किमान वेतन 40 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. हे आता 18 हजारावरुन 24 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. यासाठी कायदा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here