कारखान्यांचे खाजगीकरण झाले तर शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल व स्थानिकांना रोजगार मिळेल : निरानी

म्हैसूरः माजी मंत्री आणि भाजपचे आमदार मुरुगेश निराणी यांनी मंगळवारी सांगितले की, राज्य संचालित उद्योगांचे खाजगीकरण केले पाहिजे.

म्हैसूर राजघराण्यातील प्रमोदा देवी वडियार यांनी निराणी यांना पांडवपुरा सहकारी साखर कारखान्याच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले होते. उद्धाटनानंतर ते बोलत होते.

निरानी म्हणाले, पांडवपुरा कारखाना लीजवर घेण्याच्या सरकारी निर्णयाचा विरोध कुणी केला नाही. मंडया जिल्ह्यातील शेतकरी आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींनी नी आपल्या भावना व्यकत केल्या. ऊस शेतकऱ्यांचे थकीत 26 करोड रुपये सरकारकडून लवकरच भागवले जातील. आम्ही कारखाना सुरु करुन या वर्षी मोठ्या प्रमाणात ऊस गाळप करू. स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु असल्याचे, निरानी यांनी सांगितले.

माय शुगर बाबत काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, माय शुगर बाबत कोणताही निर्णय मी घेतलेला नाही. माय शुगर च्या सर्व फॅक्ट्रींचे सरकारने खाजगीकरण करावे अशी माझी मागणी आहे. सरकार कारखाने चालवू शकत नाही. खाजगी कंपन्या कारखाने योग्य पध्दतीने चालवू शकतात. सरकार कारखाने विकू शकत नाहीत, पण खाजगी कंपन्यांना लीजवर देऊ शकतात. केपीसीसी चे अध्यक्ष डी के शिवकुमार टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.

निरानी शुगर कडून प्रलंबित असणाऱ्या थकबाकी बाबत ते म्हणाले, 32 करोड रुपये भागवण्याची गरज आहे. येत्या दहा दिवसात हे पैसे भागवले जातील.

मंडया जिल्ह्याच्या एम पी सुमलता म्हणाल्या, पांडव पुरा आणि माय शुगर कारखाने बंद झाले आहेत. प्रत्येक गाळप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून जावे लागते. जर या कारखान्यांचे खाजगीकरण झाले तर ते शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल. पण स्वार्थासाठी काही नेते याला राजकीय वळण देत आहेत. सरकारने कारखान्यांमध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यापैकी तब्बल 420 करोड रुपये गमावले आहेत. जर सरकार हे कारखाने चालवू शकत नसेल तर हे कारखाने खाजगी कंपन्यांना चालवायला द्यावेत, असेही त्यांनी सांगितले

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here