ऊस दर न वाढवल्याने प्रियंका गांधींचे यूपी सरकारवर टीकास्त्र

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने गेल्या तीन वर्षात उसाचे दर वाढवले नसल्याबद्दल काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. पंजाब सरकारने एसएपीमध्ये केलेल्या वाढीचे उदाहरण त्यांनी दिले आहे. प्रियंका यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की उत्तर प्रदेशमधील भाजप सरकार ऊसाचा दर ४०० रुपये प्रती क्विंटल करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आले. मात्र गेल्या तीन वर्षात त्यांनी एक रुपयाही दर वाढवलेला नाही.

त्या म्हणाल्या, उत्तर प्रदेशमध्ये आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांना धमकी दिली जाते. प्रियंका यांनी उत्तर प्रदेशची तुलना पंजाबशी केली आहे. तेथे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने मागमीनंतर ऊस दरात वाढ केली आहे. पंजाब काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले आणि ऊसाचा दर ३६० रुपये प्रती क्विंटल केली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी मंगळवारी ऊसाच्या राज्य सहमती दरामध्ये (एसएपी) ३५ रुपये प्रती क्विंटल वाढ करण्यात मंजूरी दिली. शेतकऱ्यांचा विरोध आणि शेतकरी तसेच सरकारच्या दरम्यान झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांनी ही दरवाढ मान्य केल्याचे संयुक्त किसान मोर्चाने सांगितले. ही शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक घटना आहे असे सांगण्यात आले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here