ऊसाचा दर न वाढवल्याने प्रियंका गांधींचे सरकारवर टीकास्त्र

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात उसाचा दर न वाढवल्याने विरोधी पक्षाने सरकारने घेरण्याची तयारी केली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी गुरुवारी घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दराबाबत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. गेल्या तीन वर्षापासून सरकारने ऊस दरात वाढ केली नसल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या दरात वाढ सुरूच ठेवली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती गेल्या तीन-चार महिन्यात ६० ते ७० टक्के वाढल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांसाठी ऊस दरात गेल्या तीन वर्षात वाढ करण्यात आलेली नाही. प्रियंका यांनी हिंदीमध्ये हॅशटॅग “महंगे दिन” (महागाईचे दिवस) आणि “गन्ने के दाम बढ़ाओ” (उसाची दरवाढ करा) असे ट्वीट केले आहे.

केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या किमान आधारभूत किंमतीमध्ये आगामी गळीत हंगामासाठी ५ रुपयांची वाढ केली. एफआरपी प्रती क्विंटल २९० रुपये करण्यात आली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here