सरकारने सक्रिय आणि वेळेवर केलेल्या उपाययोजनांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गतवर्षांपेक्षा नियंत्रणात

देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि अत्यावश्यक खाद्यपदार्थांच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारने घेतलेल्या सक्रिय आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे,जीवनावश्यक वस्तूंच्या,विशेषतः खाद्यतेलाच्या किमतीत या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत घट नोंदवली गेली आहे.

साधारणपणे ऑगस्ट ते डिसेंबर या काळात सणासुदीपूर्वीच्या कालावधीत, खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ होते,असे या किंमतींचा मागील कल दर्शवितो. वर्ष 2020 मध्ये खाद्यतेलांच्या किंमतीत 7-12% आणि 2019 मध्ये 3-8% एवढी वाढ झाली होती.तथापि, चालू वर्षात,याच्या उलट कल दिसून येत असून, देशांतर्गत वस्तूंच्या किंमतीत ऑगस्ट, 2022 मध्ये 2-9% इतकी घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत घसरण होत आहे.सरकारचे सतत सुरू असलेले निरीक्षण आणि खाद्यतेल उद्योगाशी होत असलेला विचारविनिमय यामुळे खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत झालेल्या घसरणीचा लाभ आता ग्राहकांपर्यंत पोहोचवला जात आहे.

ग्राहकांना चढ्या किमतींपासून दिलासा मिळावा यासाठी सरकारने इतरही अनेक पावले उचलली आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या केंद्रांकडून प्राप्त (डीओसीएDoCA) कल पाहता, गेल्या नऊ महिन्यांच्या तुलनेत विविध वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत; यात हरभरा डाळ (-₹3), कांदा (-₹10), टोमॅटो (-₹5), चहा (-₹7) यांचा समावेश आहे.

रवठा-साखळीतील दबाव कमी राखला गेल्यास अलीकडच्या आठवडयात दिसून येणारी वस्तूंच्या-किंमतीतील घट कायम राहिल्यास ग्राहकांना अधिक दिलासा मिळेल.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here