विभागीय आयुक्तांनी जाणून घेतल्या ऊस शेतकऱ्यांच्या समस्या

153

जायकवाडी (जि. औरंगाबाद)

ऊस उत्पादक शेतकरी सध्या वापरत असलेल्या पाणी व्यवस्थापन पद्धती, त्यापासून मिळणारे उत्पादन व उत्पन्न, तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्या विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जाणून घेतल्या. आयुक्तानी पैठणचा दौरा करुन या तालुक्यामधील कातपूर, करंजखेडा, रहाटगाव, आखातवाडा येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांना असणाऱ्या अनेक अडचणींबाबत जाणून घेतले. भर पावसातही त्यांनी गावातील सर्व पिकांची पाहणी केली.

यात प्रामुख्याने तालुक्‍यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत सध्या शेतकरी वापरत असलेली ऊस पाणी व्यवस्थापन पद्धत आणि शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विविध समस्यांविषयी त्यांनी माहिती घेतली. यावेळी उपायुक्त श्री. बोथरा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, मंडळ कृषी अधिकारी विशाल साळवे, रामनाथ कारले, कृषी पर्यवेक्षक वसंत कातबने, किशोर पाडळे, यशवंत चौधरी, भागचंद लघाने, राजू गावडे, सचिन खराद, सचिन निवारे, कृषी सहायक मनीषा पवार, रजनी पवार, सुवर्णा अकोलकर, जयश्री पिंपरिया, संतोष भागवत, विकास वाघमारे, तसेच शेतकरी देवीचंद मोरे, गोकुळ रोडी, ज्ञानेश्वर मस्के, दीपक मोरे, योगेश जाधव, बाबासाहेब भुजबळ, दादासाहेब बर्डे, निवृत्ती रोडी यांच्यासह चारही गावांमधील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी भरपावसात अनवाणी चिखल तुडवत थेट शेतातील बांधावर जाऊन ऊस, मका, मोसंबीसह कातपूर येथील शेतकरी दीपक मोरे यांच्या पशुधन व दुग्ध व्यवसायाची पाहणी केली.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here