किच्छा येथील शेतकऱ्यांनी मांडल्या ऊस विकास मंत्र्यांसमोर समस्या

73

किच्छा : किच्छा येथील गेस्ट हाऊसमध्ये ऊस राज्यमंत्री स्वामी यतीश्वरानंद यांनी शेतकऱ्यांची बैठक घेतली. त्यांच्या समस्या लवकर सोडवल्या जातील असे आश्वासन दिले. या दौऱ्यावेळी भाजपच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
गुरुवारी किच्छा साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर आमदार राजेश शुक्ला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी ऊस राज्यमंत्री यतीश्वरानंद यांनी शेतकरी, कारखाना प्रशासन, भाजप कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली.
शेतकऱ्यांनी ऊस समितीकडून १०-१५ दिवस शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ऊस बिले जमा केली जात नसल्याची तक्रार केली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर ऊस राज्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत समितीचे सचिव संध्या पाल यांना यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले.

शेतकऱ्यांनी साखर कारखान्याचा गाळप हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू करण्याची मागणी केली. गाळप हंगाम निम्मा संपला तरी वजनकाट्याची समस्या भेडसावत असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याची देखभाल योग्य पद्धतीने न झाल्यास ऐन हंगामात गाळप महिनाभर बंद ठेवावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो. याबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली.

याबाबत ऊस राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी उप जिल्हाधिकारी नरेश दुर्गापाल, मुख्याधिकारी वीर सिंह, चंद्रमोहन सिंह, साखर कारखान्याचे कार्यकारी अधिकारी रुचि मोहन रयाल, डी. एन. मिश्र, भाजप जिलाध्यक्ष शिव अरोरा, महामंत्री विवेक सक्सेना, प्रताप सिंह, मो. ताहिर, राजीव चौधरी, डब्लू शाही, नरेंद्र ठुकराल, राज गगनेजा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here