साखर कारखान्याकडे ऊसाच्या कमतरतेमुळे अडचण

मुजफ्फरनगर : मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने साखर कारखान्यासमोर अडचणी निर्माण होत आहेत. गेले आठवडाभर कारखान्याकडे १० ते १२ हजार क्विंटल उस कमी येत आहे. कारखान्याचा गाळप हंगाम २० मेपर्यंत संपण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऊस पाठवावा असे आवाहन साखर कारखान्यच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

कारखान्याचे उपाध्यक्ष अरविंद कुमार दीक्षित यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यापासून कारखान्याकडे १० ते १२ हजार क्विंटल ऊस कमी येत आहे. कारखान्याची गाळप क्षमता ७२ हजार क्विंटल प्रतिदिन आहे. मात्र, सध्या दररोज सरासरी ६० हजार क्विंटल ऊस उपलब्ध होतो. शेतकऱ्यांना वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, शेतकरी सध्या गव्हाची कापणी तसेच उसाची लागवड करण्यात गुंतले असल्याने उसाचा पुरवठा करू शकत नाहीत. शेतकऱ्यांनी आपल्या अन्य कामांसोबत कारखान्याला ऊस वेळेवर पाठवावा. कडक उन्हाळ्यापूर्वी ऊस कारखान्यात येणे अपेक्षित असल्याचे उपाध्यक्ष दीक्षित म्हणाले.

कारखान्याने आतापर्यंत १ कोटी २५ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. २० मे अखेरीस कारखाना आपला गाळप हंगाम पूर्ण करेल असे उपाध्यक्ष दीक्षित यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here