वेळेवर ऊस बांधणी केल्यास उत्पादनवाढ शक्य : डॉ. मलिक

पलवल : युवा सेवा संघटनेच्यावतीने दिघोट गावात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात कृषी तज्ज्ञ डॉ. महावीर सिंह मलिक यांनी मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी रामबीर यांच्या अध्यक्षतेाली झालेल्या या मेळाव्यात शेतकऱ्यांनी वेळेवर ऊस बांधणी करून उत्पादन वाढवावे असे आवाहन करण्यात आले. उसावर पडणाऱ्या कीड, रोगांना वेळीच ओळखून त्या पासून पिकाचा बचाव करणे आणि उत्पादन वाढीबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कृषी तज्ज्ञ डॉ. महावीर सिंह मलिक यांनी सांगितले की, पलवल साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात २० हजार एकरात ऊस पिक आहे. उसाच्या अधिकाधिक उत्पादनासाठी संतुलित खतांचा वापर, योग्य सिंचन, किड-रोगाचे नियंत्रण याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ऊस कोसळू नये याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे. तर त्यापासून चांगले उत्पादन मिळू शकेल. किडींसह उसाचे उंदरांपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. जुलै अखेरीस अथवा ऑगस्ट महिन्यात ऊस पिक बांधणी करावी असे त्यांनी सांगितले.

ऊस पिक जमिनीपासून तीन ते चार फूट उंचीचा झाल्यावर त्याची बांधणी सुरू करावी. बांधणी करताना त्याचा वरील भाग खुला ठेवावा. किमान दोनदा बांधणी करावी. जादा ऊंच जाणारा ऊस असेल तर ते एकमेकांना बांधावेत. तरच पाऊस अथवा जोरदार वाऱ्यातही ऊस कोसळणार नाही, असा सल्ला डॉ. महावीर सिंह मलिक यांनी दिला. यावेळी शेतकरी बिजन ढोलिया, रोशनलाल, सुरेंद्र, कल्लू, सुखबीर फौजी, तुहीराम, धनसिंह, मनोज, पंडित जगदीश, गोपाल, सतबीर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here