उत्तर प्रदेशात आतापर्यंत १,०२७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

लखनौ : उत्तर प्रदेशातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्याच्या ऊस विभागाच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेशमध्ये २०२३-२४ चा गळीत हंगाम गतीने सुरू आहे. चालू हंगामात राज्यातील २३ साखर कारखान्यांकडून गाळपाचे काम सुरू आहे.

राज्यात आतापर्यंत ९,७०१ लाख क्विंटलपेक्षा जास्त उसाचे गाळप झाले आहे. आणि आतापर्यंत १,०२७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. अखंडित ऊस पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पुढील पिकासाठी वेळेवर शेत रिकामे करण्यास मदत मिळाली आहे.

राज्यात उसाची उत्पादकता सातत्याने वाढत आहे. गेल्या सहा वर्षात ऊसाची उत्पादकता प्रती हेक्टर ७४२ क्विंटल होती, तर २०२२-२३ मध्ये ती प्रती हेक्टर १११ क्विंटलने वाढून ८५३ क्विंटल प्रती हेक्टर झाली. तर खोडवा पिकामध्येही २०२२-२३ मध्ये उत्पादकता प्रती हेक्टर १२० क्विंटलने वाढून ८२४ क्विंटल प्रति हेक्टर झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here