बिद्री कारखान्यातही होणार इथेनॉल निर्मिती

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

कोल्हापूर : चीनीमंडी

कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री सहकारी साखर कारखाना आता इथेनॉल प्रकल्प राबवणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली. साखर उत्पादनाबरोबर कारखान्याने सहवीज निर्मितीप्रकल्प राबवला होता. त्याचा कारखान्याला फायदा झाला होता. आता इथेनॉल प्रकल्पातूनही कारखान्याला फायदा होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात सभासद शेतकऱ्यांची पूर्ण एफआरपी अदा केली आहे. यंदा अशी एफआरपी अदा करणारा हा जिल्ह्यातील पहिला कारखाना होता. या पार्श्वभूमीवर बिद्री ग्रामपंचायतीच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पाटील यांनी इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन दिले.

आमदार पाटील म्हणाले, कारखान्याच्या कामकाजात शिस्त आहे. त्यामुळेच कारखान्याची आर्थिक बाजू आता चांगली झाली आहे. त्यामुळेच कारखाने अडचणीत असतानाही पूर्ण एफआरपी देणे शक्य झाले. कार्यक्रमास माजी सरपंच पाडुरंग पाटील, विठ्ठलराव खोराटे आदी प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here