गहू, तांदूळ, मक्का, डाळींच्या पिकांपासून उत्पादन होणार दुप्पट

एटा : अवागढ कृषी विज्ञान केंद्रावर भारतीय कृषी संशोधन संस्थेचा ९५ वा स्थापना दिवस तथा तंत्रज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी औद्योगिक प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते. या कार्यक्रमात केंद्रातील संशोधक, शेतकऱ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला. यावेळी गहू, मक्का, तांदूळ, डाळवर्गीय पिकांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असे सांगण्यात आले.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कृषी विज्ञान केंद्रातील या ऑनलाइन कार्यक्रमात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय मत्स्य पालन, पशुपालन मंत्री पुरुषोत्तम रुपाला, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी मार्गदर्शन केले. देशभरातील ७३१ कृषी विज्ञान केंद्रे, ११३ आयसीएआरच्या संस्था, ७४ कृषी विद्यापीठांतून शेतकऱ्यांसाठी संशोधन केले जात आहे. कृषी उत्पादने, गुणवत्ता वाढ, उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी गहू, तांदूळ, मक्का, डाळी, कडधान्य आणि नकदी पिकांच्या उत्पादनावर प्रकाशझोत टाकण्यात आला. शेतकऱ्यांचे उत्पन्न यातून दुप्पट होईल असा विश्वास यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केला.

कृषी क्षेत्राच्या यशस्वी प्रसारासाठी आयसीएआरची शिक्षण प्रणाली मजबूत करण्यावर भर द्यावा असे आवाहन करण्यात आले. प्रदर्शनात सहभागी असलेल्यांसाठी पशू विज्ञान, कुक्कुट पालन, मत्स्य पालन याविषयीच्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. प्रगतीशील शेतकरी कमल सिंह, सुनील कुमार, राजकिशोर पाठक, गेंदालाल, सुनीता देवी, श्यामपाल सिंह, भूमि कुमारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here