XXXI ISSCT काँग्रेस : प्रोफेसर नरेंद्र मोहन यांचा ‘उत्कृष्ट पुरस्कारा’ने सन्मान

हैदराबाद : कानपूरस्थित नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. नरेंद्र मोहन यांना हैदराबाद येथे आयोजित इंटरनॅशनल सोसायटी ऑफ शुगर केन टेक्नॉलॉजिस्टच्या XXXI काँग्रेस दरम्यान “उत्कृष्टता पुरस्कार” प्रदान करण्यात आला. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ शुगरकेन टेक्नॉलॉजिस्टचे सरचिटणीस डॉ. जीन-क्लॉड ऑट्रे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. ऑट्रे म्हणाले की, प्रो नरेंद्र मोहन यांनी भारतीय साखर उद्योगाला व्यवहार्य बनविण्यासाठी उत्कृष्ट कार्य केले आहे. आणि विविध व्यवसायिक मॉडेल विकसित करण्यात त्यांचे योगदान अतुलनिय आहे. त्यामुळे त्यांचा या पुरस्काराने सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारतीय साखर उद्योगाला पुरस्कार समर्पित करताना प्रा. नरेंद्र मोहन यांनी सांगितले की, अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध रणनीतींच्या अंमलबजावणीत सतत पाठिंबा आणि मदत केल्याबद्दल मी उद्योगाचा आभारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here